Posts

Showing posts from March, 2021

नैसर्गिक शीतपेयांचा आस्वाद घ्या !

  नैसर्गिक शीतपेयांचा आस्वाद घ्या !     उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जशजशी वाढू लागते, तसतसे थंडपेयांच्या दुकानाकडे आपले पाय वळू लागतात. दूरदर्शनवरून होणारा जाहिरातींचा मारा आणि त्यांची चटकदार चव यामुळे कृत्रिम शीतपेयांची आर्डर आपोआप दिली जाते. पण प्रमाणाबाहेर स्ट्राँग पेय आणि साखर यामुळे कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने आरोग्य बिघडते. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपाची शीतपेये घेतल्यास ती पोषण करणारी, थंड, शरीराची ऊष्णता कमी करणारी असतात.     पाणी-   पाणी ही सर्वोत्कृष्ट नैसर्गिक शीतपेय आहे. ते खरे जीवन आहे. आयुर्वेदात पाण्याचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत. त्याविषयी नंतर कधी तरी. पाणी हे थंड आहे. फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातले गार केलेले पाणी चांगले. उन्हाळ्यात पाणी उकळून गार करून प्यावे. फील्टरचे पाणी जरी शुद्ध असले तरी पाणी उकळल्याने ते गुणांनी हलके होते. फ्रीजमधील थंड पाण्यामुळे भूक कमी होऊन पोटात जडपणा वाढतो, उलट माठाचे पाणी तुलनेने हलके असते. वाळा, चन्दन, मोगरा, गुलाब यासारख्या सुगंधीत द्रव्यांनी सुगंधीत करून प्यावे.     शहाळ्याचे, नारळाचे पाणी